Information.net101
कृषिमंत्र्यांविरोधात सिन्नरमध्ये आंदोलन
सिन्नर : कृषिमंत्री माणिकराव
कोकाटे यांचे मंत्रिपद व आमदारकी काढून घ्यावी, या मागणीसाठी सिन्नर संघर्ष समिती, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी तहसीलसमोर निदर्शने केली. मागणीचे निवेदन देण्यात आले. संघर्ष समितीचे अध्यक्ष शरद शिंदे, मनसेचे तालुकाध्यक्ष रामदास खैरनार, माजी अध्यक्ष विलास सांगळे, शहराध्यक्ष गणेश मुत्रक, समितीचे शिवाजी गुंजाळ, संजय कुऱ्हाडे, एकनाथ दिघे, भगवान आव्हाड, धनंजय बोडके आदींनी आंदोलन केले. 'अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी श्री.
सिन्नर तहसीलसमोर आंदोलन करताना सिन्नर संघर्ष समितीचे पदाधिकारी.
कोकाटे रमी खेळत होते. घर घोटाळ्यात दोन वर्षे शिक्षा सुनावली होती. शेतकऱ्यांना भिकारी म्हणून हिणविण्यात आले. लोकशाहीत आंदोलन करणाऱ्यांवर कार्यकर्ते पाठवून दमबाजी केली जात आहे. सिन्नरकरांना स्वच्छ व्यक्ती आमदार म्हणून निवडण्यासाठी
कोकाटे यांचे कृषिमंत्री व आमदारकी काढून घेण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
आंदोलक खोटरेंची प्रकृती खालावली
बिऱ्हाड आंदोलन : मंत्रिमंडळ बैठकीत आज तोडग्याची शक्यता
नाशिक, ता. २२ येथे पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलनावर बुधवारी (ता. २३) मंत्रिमंडळाच्या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे. आदिवासी आमदार थेट आदिवासी विकासमंत्र्यांना भेटून हा विषय मार्गी लावण्याचा आग्रह करणार असल्याचे मंत्री नरहरी झिरवाळ व आमदार हिरामण खोसकर यांनी आंदोलकांना सांगितले. दरम्यान, आंदोलक तुळशीराम खोटरे यांची प्रकृती खालावल्याने तपासणी करण्यात आली.
शहरातील ईदगाह मैदानावर गेल्या नऊ दिवसांपासून तुळशीराम खोटरे यांचे उपोषण सुरू आहे. मंगळवारी = (ता. २२) त्यांची प्रकृती खालावली. त्यांना जागेवर उठून बसणेही अवघड झाल्याने आमदार खोसकर व मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी
नाशिक उपोषणकर्त्यांशी चर्चा करताना आमदार हिरामण खोसकर व मनसेचे दिनकर पाटील.
त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. मोबाईलवर त्यांनी आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याशी संवाद साधला. बुधवारी मंत्रिमंडळाचीबैठक आटोपताच आदिवासी विकासमंत्री प्रा. अशोक उईके यांची भेट घेऊन याविषयी तोडगा काढू, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे बिऱ्हाड आंदोलनावर बुधवारी काहीतरी तोडगा निघण्याची शक्यता वर्तविली जाते. ि दरम्यान, मंत्री नरहरी झिरवाळ यांनीही प आंदोलकांच्या मागण्या समजून घेत त्याची नोंद घेतल्याने हा विषय आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे आंदोलक सांगतात.
बेमुदत उपोषण करत असलेले खोटरे यांची प्रकृती खालावली आहे. वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी केली; त्यांना 'ईसीजी' काढण्याचा सल्ला दिला. उपोषणस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून देणे शक्य नसल्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागेल. मात्र त्याला त्यासाठी उपोषणकर्ते खोटरेंनी नकार दिल्यामुळे आरोग्य विभागाचा नाइलाज झाला.