🚩 बेमुदत उपोषणाची परवानगी द्या
💪🏻पोलिसांच्या अटी जरांगे यांना अमान्य; 🚩मराठा कार्यकर्ते आझाद मैदानाच्या दिशेने.
👉🏻आपटाळे, (जि. पुणे) ता. २८: राज्य शासनाने आझाद मैदानावर आंदोलनाला एक दिवसाची परवानगी देऊन गोरगरीब मराठ्यांची चेष्टा केली आहे. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत शासनाने बेमुदत आंदोलन करण्याची पूर्ण वेळ परवानगी द्यावी. सरकार मराठा समाजाला लक्ष्य करत आहे. समाजाला मुर्ख चनविण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र समाजाच्या हितासाठी आम्ही गोळ्या झेलायला तयार आहोत. मराठा समाजाच्या नागरिकांनी शांततेत व कायद्याचे पालन करून आंदोलन करावे," असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो मराठा कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होऊ लागले असून आझाद मैदानावरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी मुंबई येथे आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची सुरुवात त्यांनी गुरुवारी (ता. २८) किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मस्थळाचे दर्शन घेऊन केली. जरांगे पाटील हे त्यांच्या ताफ्यासह बुधवारी (ता. २७) सकाळी अंतरवाली सराटी येथून जुन्नरच्या दिशेने निघाले होते. त्यांचा मुक्काम जुन्नर येथे नियोजित होता. मार्गावर ठिकठिकाणी मराठा समाजाकडून त्यांचे स्वागत करण्यात आल्याने त्यांचे गुरुवारी सकाळी पावणेसहा वाजता जुन्नर येथे आगमन झाले. "मुख्यमंत्री फडणवीसयांनी मराठा समाजाच्या वेदना समजून घ्याव्यात. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची ही योग्य संधी आहे. त्याचे सोने करा. आरक्षण देऊन मराठा समाजाची मने जिंका. असे केल्यास राज्यातील मराठा समाज मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचे उपकार विसरणार नाही. विनाकारण मराठा विरोधी भूमिका सोडून द्या, अन्यथा येणाऱ्या दिवसांत तुमचे राजकीय करिअर बरबाद होईल," असा इशाराही जरांगे यांनी दिला.
🚩जरांगेंशी केव्हाही चर्चा करू : विखे-पाटील
👉🏻शिर्डी : "मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्याची सरकारची केव्हाही तयारी आहे. आरक्षणाच्या बाबतीत महायुती सरकारने जे काम केले तसे निर्णय महाविकास आघाडीच्याकाळात झाले नाही. केवळ मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर वैयक्तिक टीका करून आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारला सल्ले देण्यापेक्षा आरक्षण घालविल्याबद्दल प्रायश्चित्त घ्यावे," अशी टीका जलसंपदा मंत्री तथा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
"जरांगे पाटील यांच्याशी प्रत्यक्ष नाही परंतु त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत संपर्कसाधला होता. मात्र व्यवस्थित निरोप न पोहोचल्यामुळेच त्यांचा गैरसमज झाला, तो आम्ही दूर करू. सरकार केव्हाही त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे. आपल्या आंदोलनासाठी जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम असल्यामुळे मुंबईतच चर्चा करू ही आमची भूमिका आहे. उपसमितीच्या सदस्यांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय आम्ही घेणार आहोत."
🚩मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण.
👉🏻नागपूर : "राज्य सरकार मराठा
समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेवर ठाम आहे, पण कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी केले जाणार नाही. एका समाजातून आरक्षण काढून दुसऱ्याला देणे योग्य होणार नाही. मात्र, काँग्रेसने आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी," असे मत व्यक्त करत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना काँग्रेसवर हल्लाबोल केला.
नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, “२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय झाला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मराठा आरक्षण ओबीसींच्या कोट्यातून न देता स्वतंत्र द्यावे, असे सांगितले होते. आरक्षणाबाबत काँग्रेस नेत्यांची भूमिका नेहमीच गोंधळलेली आहे. राहुल गांधी म्हणतात, ओबीसी आरक्षण कायम ठेवा, जातनिहाय जनगणना करा पण महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते ओबीसी आरक्षण काढून मराठ्यांना देण्याची भाषा करतात. त्यामुळे काँग्रेसने मराठा आरक्षणाबाबत नेमकी भूमिका काय?" हे स्पष्ट करावे. आंदोलनाचा अधिकार सर्वांना आहे, मात्र गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या सणात आंदोलन करणे योग्य नाही," असेही त्यांनी सांगितले.🚩💪🏻