📊शेअर बाजारात घसरण सुरूच📉

 

📊 शेअर बाजारात घसरण सुरूच📈.


मुंबई, ता. १४ : जागतिक शेअर बाजारातील संमिश्र कल, आयटी शेअरची विक्री आणि परदेशी गुंतवणूक बाहेर जात असल्याने भारतीय शेअर बाजारात आठवड्याची सुरुवात नकारात्मक झाली. 'सेन्सेक्स' आणि 'निफ्टी'ने आज पाव टक्क्याने तोटा नोंदवला. निर्देशांकांची ही चौथी घसरण आहे. आज बाजाराची सुरुवात घसरणीनेच झाली. त्यानंतर 'निफ्टी'ने स्थिर होण्याचा प्रयत्न केला. परंतु, मोठ्या शेअरच्या विक्रीच्या दबावामुळे निर्देशांक खाली आला. आज दिवसअखेर 'सेन्सेक्स' २४७ अंशांनी घसरून ८२,२५३.४६ अंशांवर स्थिरावला, तर 'निफ्टी' ६७.५५ अंशांनी घसरून २५,०८२.३० अंशांवर बंद झाला.

दिवसभरात 'सेन्सेक्स' ४९०.०९ अंशांनी घसरून ८२,०१०.३८ अंशांवर आला होता, मात्र दिवसअखेर खरेदी झाल्याने त्याने काही तोटा भरून काढला आणि तो ८२,२५३.४६ अंशांवर स्थिरावला. नऊ जुलैपासून सुरू झालेल्या घसरणीच्या चार दिवसांत 'सेन्सेक्स' जवळजवळ १,४६० अंशांनी आणिनिफ्टी' ४४० अंशांनी घसरला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, अन्नधान्य आणि इंधन महागाई वाढल्याने आणि उत्पादनांच्या किमती कमी झाल्यामुळे जूनमध्ये घाऊक महागाई १९ महिन्यांनंतर ०.१३ टक्क्यांनी कमी झाली, तर भाज्या, डाळी, मांस आणि दुधासह अन्नपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे किरकोळ महागाई सहा वर्षांतील नीचांकी पातळीवर आली. महागाईदर २.१ टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. या सकारात्मक बाबींमुळे निर्देशांकातील घसरण मर्यादित राहीली.

'सेन्सेक्स' मध्ये एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक १.५८ टक्क्यांनी घसरण झाली. टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, इन्फोसिस, एचसीएल टेक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, लार्सन अँड टुब्रो आणि टाटा मोटर्स यांच्या शेअरचे भाव घसरले, तर एटरनल, टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा आणि आयटीसी या शेअरचे भाव वधारले. मिड कॅप ०.६७टक्क्यांनी आणि स्मॉल कॅप ०.५७टक्क्यांनी वधारला. क्षेत्रीय निर्देशांकात आयटी १.०७ टक्क्यांनी, आयटी ०.९९ टक्क्यांनी, तंत्रज्ञानाअमेरिकेचे आयातशु हंगामाची मंद सुरुवात यामुळे देशांतर्गत बाजारात एकत्रीकरण सुरूच आहे. शेअरचे मूल्यांकन तीन वर्षांच्या उच्च पातळीवर असल्याने गुंतवणूकदार सावध भूमिका घेत आहेत. आरोग्यसेवा, रिअॅलिटी, ग्राहकोपयोगी क्षेत्रात वाढ होत आहे, तर उत्पन्न कमी झाल्यामुळे आयटी क्षेत्र मागे आहे.अजित मिश्रा, संशोधन प्रमुख, रेलिगेअर.


०.७९ टक्क्यांनी आणि औद्योगिक ०.२४ टक्क्यांनी घसरले. रिअल्टी १.३८ टक्क्यांनी, आरोग्यसेवा १.१५ टक्क्यांनी, ग्राहकोपयोगी ०.५४ टक्के, कमोडिटी ०.२४ टक्के आणि ऊर्जा क्षेत्र ०.२४ टक्क्यांनी वाढले. 'बीएसई' वर २,१३७ शेअर घसरले, तर २,०५४ शेअर वधारले आणि १४९ शेअर स्थिर होते. आशियाई बाजारात, सोल, शांघाय आणि हाँगकाँग बाजार तेजीत होते, तर जपानमधील शेअर बाजारात घसरण झाली. युरोपीय बाजारही नकारात्मक क्षेत्रात व्यवहार करत होते. शुक्रवारी अमेरिकी बाजार तोट्यात बंद झाले.📊

'टाटा टेक'ला तिमाहीत १७० कोटींचा एकत्रित नफा.
मुंबई, ता. १४ : आघाडीची

उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल सेवा कंपनी टाटा टेक्नॉलॉजीजने चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात वार्षिक ५.१ टक्क्यांनी वाढ नोंदवत, १७० कोटी रुपये नफा नोंदवला आहे. निव्वळ नफ्यात ९.८ टक्क्यांनी घट झाली आहे.

कंपनीने तिच्या मुख्य विभागांमध्ये कमकुवत कामगिरी नोंदवल्यामुळे ऑपरेशन्समधून एकत्रित महसूल घटून १,२४४ कोटी झाला. सेवा विभागातील महसूल वार्षिक ५.९ टक्के आणि २.२ टक्क्यांनी घटून ९६३ कोटी रुपये झाला, तर तंत्रज्ञान विभागातील महसूलवार्षिक तिमाहीत ३.२ टक्क्यांनी घटून २८० कोटी रुपये झाला. अमेरिकी डॉलरच्याबाबतीत, कंपनीने १४.५३ कोटी रुपये महसूल नोंदवला. स्थिर चलन आधारावर, महसूल वार्षिक तिमाहीत ४.६ टक्क्यांनी कमी झाला. त्यामध्ये, सेवा विभागाने ११.२५ कोटी डॉलरचे योगदान दिले.
"तिमाहीची सुरुवात सावधगिरीने झाली असली, तरी नंतर ग्राहकांचा विश्वास हळूहळू बळकट झाला, उत्पादन नवोपक्रम आणि डिजिटल परिवर्तनाला पाठिंबा मिळाला," असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक वॉरेन हॅरिस म्हणाले.📊

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post