📚माझा आवडता विषय
मराठी
माझ्या इयत्तेतील सर्वच विषय मला आवडतात. पण माझा आवडता विषय आहे 'मराठी'!
माझी मातृभाषा आहे गुजराती ! मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते. बहुतेक व्यवहारात हिंदी भाषाच वापरली जाते. तरीपण मला सर्वांत आवडते मराठी भाषा! अगदी लहानपणी माझी मराठीशी ओळख झाली. माझे आईबाबा दोघेही डॉक्टर असल्यामुळे दिवसभर कामात असत. मला सांभाळायला मैनामावशी आमच्याकडे राहत. माझा दिवस मैनामावशीच्या सहवासात जात असे. तिच्या माझ्याशी सर्व गप्पागोष्टी चालत त्या मराठीतच ! त्यामुळे काऊचिऊपासून ज्ञानेश्वर-नामदेवांपर्यंत सर्वांबाबतच्या गोष्टी मी मैनामावशीकडून मराठीत ऐकल्या होत्या.
नवीन पुस्तके आणली की, मराठीचे पाठ्यपुस्तक मी प्रथम वाचते. म्हणून वर्गात शिकताना मला कधीच कंटाळा येत नाही. एखादी कविता मी प्रथम वाचलेली असते, पण बाईंनी तीच कविता शिकवल्यावर मला ती अधिक समजते. पाठ्यपुस्तकातील बहुतेक सगळ्या कविता मला तोंडपाठ आहेत. इतरही अनेक मराठी कविता मला पाठ आहेत. त्यांचा मला निबंध लिहिताना उपयोग होतो.
मी मराठी शुद्धलेखन चांगले समजावून घेतले आहे, त्यामुळे माझ्या लेखनात फारशा चुका होत नाहीत. भरपूर वाचन केल्यामुळे मराठी विषयात मला चांगले गुण मिळतात. त्यामुळेही हा माझा आवडता विषय ठरला आहे.
स्नेहसंमेलनाची सुरुवात होते ती विविध स्पर्धानी. खेळांच्या स्पर्धांच्या वेळी संपूर्ण मैदान रंगीबेरंगी कपड्यांनी खुलून दिसते. मैदानावर उत्साह नुसता ओसंडत असतो. प्रत्येक स्पर्धेत मोठी चुरस असते. विदयार्थी व शिक्षक यांचा क्रिकेटचा सामना रंगतो. विद्यार्थिनी आणि शिक्षिका यांच्यात खो-खोचा सामना खेळला जातो. रस्सी-खेच, मडके फोडणे, गाढवाला शेपूट लावणे अशा गमतीदार स्पर्धा होतात.

धन्यवाद,