लुटीचा बनाव करणारा सचिवच निघाला चोर
पंधरा लाखांची रोकड हस्तगत
पिंपळगाव बसवंत, ता. १५: माथाडी कामगार पगाराची पंधरा लाखांची रोकड बँकेत भरण्यासाठी जाणाऱ्या सचिव राकेश दिलीप बाविस्कर यानेच अज्ञात चोरट्यांनी डोळ्यात मिरची फेकून पंधरा लाख लुटीचा बनाव उघडकीस आला आहे. पोलिसी खाक्या दाखवताच पैसे आपल्याकडेच असल्याची कबुली त्याने दिली. याप्रकरणी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा पिंपळगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माथाडी कामगारांच्या पगाराची पंधरा लाखांची रोकड बँकेत भरण्यासाठी आलेल्या सचिव राकेश बाविस्कर यांच्या डोळ्यांत अज्ञात चोरट्यांनी मिरची फेकून ही रक्कम लुटल्याची माहिती त्यांना मिळाली.
त्यांनी तत्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता काहीही संशयास्पद न मिळाल्याने पोलिसांनी राकेश बाविस्करचीच सखोल चौकशी केली. त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या घरातून ही रक्कम हस्तगत केली. पिंपळगावचे पोलिस निरीक्षकदुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीपघगे, उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे, किरण गांगुर्डे, पोलिस गोकूळ खैरनार, अमोल देशमुख, विकास वाळुंज, नितीन गाढवे, सागर धात्रक, योगेश देवकर, संतोष शिंदे आदींच्या पथकाने हा छडा लावला.
कोयत्यांनी हल्ला करणाऱ्यांना अटक
पुणे, ता. १५ : पूर्ववैमनस्यातून गोकुळनगरमध्ये एका तरुणावर कोयते आणि तलवारींनी हल्ला केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सात सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, अन्य दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू ऊर्फ राजा संगप्पा गुळकर (वय १८), तन्वीर अक्रम शेख (वय १९), सुरेंद्र ऊर्फ अमर भुवनेश्वर साव (वय १९) कैलास बाबूराव गायकवाड (वय २२), कविराज ऊर्फ केडी सुदाम देवकाते (वय १९), प्रेम ऊर्फ पप्या बल्लेश
घुंगरगी (वय २२), यश ऊर्फ मास अंबर सोनटक्के (वय १८, सर्व जण रा. साईनगर, कोंढवा बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण ११ जुलै रोजी रात्री गोकुळनगर चौकातून एसबीआय कॉर्नरजवळून घरी जाताना त्याच्यावर टोळक्याने कोयते, तलवारींनी हल्ला कला कला हल्लेखोरांनी डोक्यात, पाठीवर, कमरेखाली आणि हातांवर वार करत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तसेच तलवारी हवेत भिरकावत नागरिकांमध्ये दहशत पसरवली.या प्रकरणात वरिष्ठ पोलिस निरीक्षक
विनय पाटणकर, पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप आणि वर्षा देशमुख यांनी पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. तपासादरम्यान आरोपी हे साळवे गार्डनमागील पडीक खोलीत लपून बसल्याची माहिती पोलिस अंमलदार सूरज शुक्ला, अभिजित जाधव, विजय खेंगरे, राहुल शेलार यांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकांनी परिसराला वेढा घालून आरोपींना अटक केली. न्यायालयाने आरोपींना १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पंकज खोपडे करीत आहेत.
वारज्यात पिस्तुलासह काडतूस जप्त
वारजे, ता. १५ : वारजे माळवाडी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला देशी बनावटीच्या पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले आहे. विकी ऊर्फ गंग्या विष्णू आखाडे (वय २७) असे त्याचे नाव असून, तो यापूर्वी खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड आणि बेकायदा शस्त्र बाळगण्याच्या गंभीर गुन्ह्यांत सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
बारटक्के हॉस्पिटलजवळील गोकुळनगर पठार परिसरात एक जण पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती पोलिस हवालदार अमोल सुतकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे आणि त्यांच्या पथकाने
घटनास्थळी धाव घेत, बसथांब्याजवळ विकी आखाडेला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे, पोलिस निरीक्षक प्रकाश धेंडे, नीलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे, हवालदार अमोल सुतकर, पोलिस अंमलदार योगेश वाघ, निखिल तांगडे आदींनी ही कारवाई केली.
तूळजाई मैदानावर तरुणांकडून दोघांना मारहाण
त्री ५९ सून
त्री ५९
पुणे, ता. १५ : तळजाई मैदानावर
धावण्याचा सराव करताना धक्का लागल्याच्या कारणावरून काही तरुणांनी पुणे फिटनेस अॅकॅडमीतील दोघांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना मंगळवारी (ता. १५) सकाळी घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी विकास नाना मेटकरी
(वय ३२, रा. तळजाई पठार, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गौड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी मेटकरी आणि पुणे फिटनेस अॅकॅडमीतील मुले-मुली तळजाई मैदानावर धावण्याचा सराव करत होते. त्यावेळी धक्का
लागल्याच्या कारणावरून ओंकार दगडे, अमर साबळे, माऊली कोकाटे, चैतन्य तोरसकर, नीलेश केदारी, हर्षवर्धन सावंत आणि इतर काही तरुणांनी मेटकरी आणि त्यांचा मित्र रवींद्र चंदर चव्हाण (वय २९ रा. हॅपी कॉलनी, कोथरूड) यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच, अॅकॅडमीतील काही मुलींना शिवीगाळही केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.